Breaking News

पारनेर तालुक्यातील आज ५८ अहवाल पॉझिटिव्ह. कान्हूर पठार येथे आज १४ व्यक्तींना कोरोना ची लागण

पारनेर तालुक्यातील आज ५८ अहवाल पॉझिटिव्ह.
कान्हूर पठार येथे आज १४ व्यक्तींना कोरोना ची लागण.
---------------
दोन दिवसात ९० अहवाल पॉझिटिव्ह वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय.
----------------
वडनेर बुद्रुक येथील एका व्यक्तीचा आज कोरोना मुळे मृत्यू.


पारनेर प्रतिनिधी -
        पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ५८ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे एका दिवसामध्ये पोझिटिव्ह रुणांची हि विक्रमी संख्या आहे त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोळाशे पार झाली आहे काल ३२ अहवाल पोझिटिव्ह आले होते व आज ५८ या दोनच दिवसात तालुक्यात ९० व्यक्तींना कोरोना ची लागण झाली आहे.
     आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कान्हूर पठार १४ भाळवणी १० जांभुत १ पिंपळनेर १ पारनेर शहर ३ वाळवणे १ हिवरे कोरडा १ कडूस २ टाकळी ढोकेश्वर १ ढवळपुरी ३ निघोज २  दैठणे गुंजाळ १ जामगाव १ सुपा ४ रुई छत्रपती ३ रांधे १ देवीभोयरे ३ लोणीमावळा ३ म्हसणे १ बहिरोबा वाडी १ काळकूप १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तालुक्यात वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या ही चिंतेचा विषय आहे नागरिक अद्यापही याबाबत गांभीर्याने घेत नाहीत अनेक गावांमध्ये नागरिक सोशल डिस्टन्स व मास्क चा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत पोलिसांनी  अनेक वेळा कारवाई केली मात्र तरीही नागरिकांवर त्याचा परिणाम होत नाही त्यामुळे ही संख्या वाढताना दिसत आहे.
दरम्यान आज सकाळी वडनेर बुद्रुक येथील ५४ वर्षे व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे ही व्यक्ती गेल्या चौदा दिवसापासून नगर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होता सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला यामुळे तालुक्यात कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ३३ वर पोहोचली आहे.