Breaking News

प्राथमिक शाळांचे लेखापरीक्षण पुढे ढकलण्याची शिक्षक समितीची मागणी !

प्राथमिक शाळांचे लेखापरीक्षण पुढे ढकलण्याची शिक्षक समितीची मागणी


नेवासा तालुका प्रतिनिधी :
     समग्र शिक्षा सन 2019 -20 या आर्थिक वर्षातील प्राथमिक शाळांचे अंतर्गत लेखा परीक्षण कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात यावे ,असे निवेदन नुकतेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे की सर्व अभिलेखे प्रत्यक्ष उपलब्ध करून देऊन  लेखापरीक्षणासाठी वेगवेगळ्या गावांतून येतील त्यामुळे कोविड-19 या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियोजित अंतर्गत लेखापरीक्षण रद्द करून यथावकाश घेण्यात यावे, अशी  विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
      याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून सात दिवसात पूर्ण जिल्हयात लेखा परिक्षण करणेबाबत सुचविले आहे. याबाबतचे वेळापत्रक देवून लेखा परिक्षणाकरिता संबधित लेखा परिक्षकांना अभिलेखे उपलब्ध करून देणेबाबत कळविण्यात आले आहे. 
   निवेदनावर संजय धामणे अध्यक्ष शिक्षक समिती, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, संजय नळे, त्याचबरोबर सरचिटणीस सिताराम सावंत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
.................................
लेखा परीक्षण करताना प्रत्यक्ष अभिलेखे हाताळावे लागत असल्याने व बरेचसे शिक्षक बंधू भगिनी शहरी भागातून येत असल्याने लेखापरीक्षण स्थगित करून कोरोना विषाणू चा प्रादूर्भाव कमी झाल्यावर घेण्यात यावे.
---------------
   भास्कर नरसाळे
कार्याध्यक्ष, शिक्षक समिती