Breaking News

कांदा निर्यात बंदीचा विरोध करत कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना कांद्याची गोणी देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.

कांदा निर्यात बंदीचा विरोध करत कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना कांद्याची गोणी देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
हिंदुस्थानच्या कांद्याला विदेशातून चांगली मागणी आहे कांद्याची निर्यात खात्रीशीरपणे करणारा देश अशी प्रतिमा आहे. मात्र केंद्र सरकारने अचानकपणे निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे हिंदुस्थानच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. सध्या जगभरात सुरू असलेली कोविड-१९ या महामारी आजाराची व त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर ओढवलेली परिस्थिती त्यातच केंद्र सरकारने सोमवारी अचानक सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा व कांदा निर्यात बंदी करण्याचा कांदा उत्पादकांवर लादलेला निर्णय त्वरित रद्द करून शेतकरी बांधवांच्या असहनिय भावनांचा विचार करून पुन्हा निर्यात चालू करावी. असे निवेदन व कांद्याची गोणी शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. 
यावेळी उत्तरनगर जिल्हाप्रमुख .राजेंद्र  झावरे म्हणाले, कांदा उत्पादक हा जिरायत आणि बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे.मागच्या वर्षी कांदा उत्पादक व इतर शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला यावर्षी अतिवृष्टी व कोरोनाचे संकट. त्यात निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव उतरले व अनेक शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचे देखील प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा व देशातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल म्हणाले, केंद्र सरकार अंबानी वादांनी अडचणीत असताना त्यांना टेंडर देऊ शकते व कंगना राणावत सारख्या देशद्रोही अभिनेत्रीला जनतेच्या पैशातून वाय प्लस सिक्युरिटी देण्यात येते तर या भारत देशाच्या अन्नदात्या शेतकऱ्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय मागे का घेऊ शकत नाही?
यावेळी उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, उपजिल्हाप्रमुख(ग्रामीण) प्रमोद लबडे, एस टी कामगार सेना प्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, युवासेना सहसचिव व विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, युवानेते विक्रांत झावरे,विभागप्रमुख विकास शर्मा, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, इरफान शेख, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, विशाल झावरे,वैभव लोणारी, अनिकेत कुऱ्हे, अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे, भूषण पाटणकर, मयुर खरनार, आकाश कानडे, वाल्मीक चिने,विजय सोनवणे, गगन हाडा., वासिम शेख, श्रीपाद भसाळे, मयुर शिवदे, सनी डहांके, विजय शिंदे,भूषण वडांगळे, प्रवीण देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते