Breaking News

पाडळी आळे शिवारातील हॉटेलवर पोलीस कारवाई तीन हजार रुपयाची दारू जप्त दोघांवर गुन्हे दाखल !

पाडळी आळे शिवारातील हॉटेलवर पोलीस कारवाई तीन हजार रुपयाची दारू जप्त दोघांवर गुन्हे दाखल .


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील पाडळी आळे गावच्या शिवारात अळकुटी ते बेल्हा रोडवर असणारे हॉटेलवर विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारू चोरून विकल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विलास भाऊ देसले 45 वर्ष, राहणार साखरे तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, हल्ली राहणार भाऊ हॉटेल, पाडळी आळे शिवार,तालुका पारनेर गणेश प्रकाश जाधव राहणार आळकुटी, तालुका पारनेर , हॉटेल मालक (फरार)यांनी भाऊ हॉटेल येथे विनापरवाना बेकायदा 3060 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचे शिलबंद बाटल्या देशी-विदेशी दारू चोरून विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल  पोपट बन्सी मुकाते यांनी दिली यावरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.