Breaking News

वासुंदे येथे महिलेला एकाने दारू पिऊन केली बेदम मारहाण !

वासुंदे येथे महिलेला एकाने दारू पिऊन केली बेदम मारहाण !


पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील 47 वर्षीय महिलेला एकाने दारू पिऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला तिच्या घरा समोर असताना आरोपी दत्तात्रय गोविंद ठाणगे राहणार वासुंदे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर हा  दारू पिऊन येऊन मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस  शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करून तिच्या कंबरेत लाथ मारून खाली पडल्याने उजव्या हातास मनगटाजवळ जखम झालेली आहे याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. जाकीर शेख करत आहेत.