Breaking News

अण्णा हजारेंनी भाजपला सुनावले

Anna Hazare - Latest News on Anna Hazare | Read Breaking News on Zee News

 अहमदनगर : गेल्या आठवड्यात भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांना पत्र लिहून दिल्लीतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. यावर हजारे यांनी लेखी पत्र पाठवून हे निमंत्रण नाकारताना भाजपला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता हजारे यांच्याकडून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याद्वारे पुन्हा एकदा अण्णा हजारेंनी आदेश गुप्ता व भाजपला उत्तर दिले आहे.

ह्या व्हिडिओमध्ये हजारे म्हणाले, मी २२ वर्षे देशासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करीत आहे. यामुळे ज्या पार्टीचे नुकसान होते, ते माझे नाव दुसऱ्या पार्टीशी जोडून लोकांमध्ये गैरसमज पसरवितात. मी कधीच कोणत्या पक्षाकडे गेलो नाही आणि जाणार नाही. केवळ देशाच्या हितासाठी काम करीत राहणार, असे अण्णा हजारे म्हणाले.

तसेच आदेश गुप्ता यांनी आपली परवानगी न घेता आपले नाव असलेले हे पत्र प्रसारमाध्यमांना का दिले, असा सवाल हजारे यांनी केला आहे. एका बाजूला केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधात काम केल्याचे सांगत असताना भाजप मात्र भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी माझ्यासारख्या ८३ वर्षाच्या फकिराला का बोलवत आहे? असा सवालही अण्णा यांनी उपस्थित केला आहे. भाजप हा देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. या पक्षात युवकांची संख्या जास्त आहे. मी जेव्हा युवक होतो, तेव्हा मी हे काम सुरू केलेले आहे. एक युवक एवढे काम करू शकतो तर यांना का शक्य नाही? अशी विचारणाही अण्णांनी केली आहे.