Breaking News

अकोल्यात कोरोना बाधितांनीं पार केला एक हजार चा टप्पा !

अकोल्यात कोरोना बाधितांनीं पार केला एक हजार चा टप्पा


अकोले /प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांणी आज  एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे  तर दोन   दिवसांत दोघांचा बळी गेल्याने कोरोना ने बळी ची संख्या १९ झाली आहे.
आज तालुक्यात  नवीन  २३  कोरोना बाधित रुग्ण आढळले.यामुळे एकुण रुग्णसंख्या १०१३ झाली आहे.
 आज गर्दणी येथील ७५ वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला.
           तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये गणोरे येथील ५२ वर्षीय महीला,३० वर्षीय महीला,२८ वर्षीय महीला,३३ वर्षीय पुरुष,०५ वर्षीय मुलगा,०४ महिन्याचे बाळ,विरगाव येथील ३७ वर्षीय पुरूष ,१० वर्षीय मुलगा,०३ वर्षीय मुलगी,३६ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ५७ वर्षीय पुरूष, रेडे येथील २५ वर्षीय तरुण,कोतुळ येथील ४६ वर्षीय महीला,अंभोळ येथील ३५ वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील २१ वर्षीय तरुण,३० वर्षीय महीला,१३ वर्षीय मुलगी,राजुर येथील ५५ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय पुरूष, औरंगपुर येथील ४४ वर्षीय पुरूष, खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शाहूनगर येथील ५२ वर्षीय पुरुष,राजुर येथील ५८ वर्षीय पुरुष,४९ वर्षीय पुरूष, अशी एकुण २३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
  ८४१ रुग्णांनी कोरोनाला वर मत मात खेळू केली तर १५३ रुग्णावर  उपचार सुरू आहे.
----