Breaking News

अकोले तालुक्यात कोव्हीड च्या उपाययोजना तोकड्या माजी आमदारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

अकोले तालुक्यात कोव्हीड च्या उपाययोजना तोकड्या
 माजी आमदारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !
-------------
रुग्ण वाहिकेवरील वाहन चालकांचे  पगार थकले!


अकोले /प्रतिनिधी :
   देशात व राज्यात कोरोना सदृश्य परिस्थिती आहे. परंतु सध्या अकोले तालुक्यातील बहुतांशी खेडयागावांमध्ये कोरोना फैलाव होत आहे. या तुलनेत आरोग्यसेवा ही अपुरी पडत आहे या साठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे
. तालुक्यातील 102 रुग्णवाहिके वर कार्यरत असणारे वाहनचालक हे खरे कोव्हिडं योद्धे आहेत त्यांना चोवीस तास सेवा द्यावी लागत आहे  अल्प मानधनावर  तव क ते काम आहे करत आहे त्यांना गेल्या 6 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कोवीड तपासणीसाठी पुरेशा प्रमाणात किट उपलब्ध नाही, अद्यापपर्यंत फक्त 3 हजार किटचा पुरवठा केलेला आहे.  तालुक्यातील कोरोनाचा आकडा एक हजारच्या पुढे गेलेला आहे. कोवीड उपचार केंद्र यांना पुरेशा प्रमाणात डॉक्टर व औषधसाठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. संगमनेर कोवीड सेंटरला अकोले तालुक्यातील कार्यरत 8 डॉक्टर यांना नियुक्ती दिलेली आहे, त्याऐवजी संबंधित डॉक्टर यांना अकोले कोवीड सेंटर येथेच नियुक्ती द्यावी. ग्रामीण रुग्णालय राजूर, ता.अकोले येथील रुग्णवाहिकेसाठी वाहनचालकाची नियुक्ती करावी. रुग्णवाहिका असूनही वाहनचालका अभावी रुग्णवाहिका उभी आहे.
अकोले(खानापूर) येथे कोवीड सेंटर आहे. तसेच अगस्ति साखर कारखान्याने 100 बेडचे कोवीड सेंटर उभारलेले आहे. या सेंटरसाठी पुरेशा प्रमाणात जिल्हा प्रशासनाकडून औषधउपचार साठा उपलब्ध केलेला नाही. अजूनही काही स्वयंमसेवी संस्था व काही दाते कोवीड सेंटर उभारणीच्या मनस्तीत आहे, यासाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर संख्या व योग्य औषध उपचार साठा उपलब्ध करण्यात येईल का? कारण अकोले तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. 
म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करता आपल्या पातळीवरुन योग्य त्या उपाययोजना करणेसाठी संबंधितांना आदेश करावेत, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना  दिले आहे.
----