Breaking News

श्रीगोंद्याचे नागवडे कुटुंब नेमके कोणत्या पक्षाचे ?

श्रीगोंद्याचे नागवडे कुटुंब नेमके कोणत्या पक्षाचे ?
---------------
विधानसभेला भाजप, विदर्भातील त्या खाजगी साखर कारखान्यासाठी महाविकास आघाडीशी सलगी !
 

श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी- 
    श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात आदराने शिवाजीराव नागवडे यांचे नाव घेतले जाते परंतु त्यांचे चिरंजीव राजेंद्र नागवडे हे स्वतःच्या फायद्यासाठी विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांना मदत केली. परंतु राजेंद्र नागवडे यांना काही दिवसातच भाजप वाईट वाटू लागल्यामुळे त्यांनी आज कै. शिवाजीराव नागवडे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांचे नावच कार्यक्रमात व पत्रिकेत घेतले नाही त्यामुळे नागवडे हे फक्त फायद्यासाठी सत्तेचा वापर करत असल्याचे चित्र आल दिसले. 
सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात सुसज्ज असे आयोजन तालुक्यातील महाविद्यालयात करण्यात आले होते आजच्या कार्यक्रमात बापू यांना मानणारा वर्ग मोठा असताना राज्यातील बहुतांशी नेत्यांना राजेंद्र नागवडे यांनी निमंत्रणच दिले नसल्याचे समजते कारण श्रीगोंदा कारखान्याचा कोणताही कार्यक्रम असला तरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण नक्कीच असायचे परंतु आजच्या कार्यक्रमात ना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना स्थान होते ना विद्यमान खासदार सुजय विखे यांना स्थान होते त्यामुळे नागवडे कुटुंब हे नेमके भाजप का कॉंग्रेसचे हेच तालुक्यातील जनतेला सद्यस्थीतीत समजत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


राजेंद्र नागवडे नेमके कोणाचे ?
सध्या कॉंग्रेसच्या जिल्हा पातळीवरील नेमणुका झाल्या आहेत त्यात जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे यांची कायम विषेश निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे त्यामुळे त्यांचे पती राजेंद्र नागवडे हे विधानसभेला भाजपाचे होते व मध्यन्तरीही भाजपाचे होते परंतु आज महसूल मंत्री थोरात यांच्याबरोबर त्यांचेच मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करण्याबाबत त्यांनी स्पष्ट केल्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही.


विदर्भातील त्या खाजगी कारखान्यामुळे भाजपची सलगी का? 
विदर्भात राजेंद्र नागवडे यांनी एक खाजगी साखर कारखाना विकत घेतला असुन या कारखान्यासाठी भाजप सरकार ने मदत करावी म्हणून भाजप च्या सरकारशी मैत्रीचे संबंध स्थापित केले परंतु तो कारखाना चालू होण्यास सध्याच्या आघाडी  सरकारच्या  माहितीची गरज असल्यामुळे आता राजेंद्र नागवडे यांची महाविकास आघाडी सरकारशी सलगी झाली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.