Breaking News

नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव उपक्रमाची सांगता !

नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव उपक्रमाची सांगता

करंजी प्रतिनिधी-
   नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव या व्हॉट्स ऍप समुहाअंतर्गत सोशल मीडियाचा वापर करून कवी- कवयित्रीना त्यांच्या कवितेला ओळख निर्माण करून देणारा एक आगळा वेगळा ओळख कवी-कवयित्रीची हा  नाविन्यपूर्ण उपक्रम १ जुलै २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत समूहाच्या माध्यमातून राबविण्यात आला. सलग दोन महिने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी-कवयित्रीनी त्यात सहभाग नोंदविला होता.  
  यात उपक्रमात कल्पना देशमुख  पंडित  निंबाळकर  संदीप  राठोड  जगन्नाथ गर्जे  डॉ. जी. के. ढमाले    प्रतिभा  बोबे  अनिकेत  मशिदकर  सुनिता  इंगळे  संध्याराणी  कोल्हे  शरद म्हंकाळे   बाळासाहेब हिरे  सविता  ढाकणे  सुभाष  साबळे   राहुल संत   वैशाली  शिंदे  भावना  गांधिले  जगदीप वनशिव  नंदकिशोर लांडगे   विलास  नवसागरे  राजश्री  लाहोर  ताठे  आरती  कोरडकर   दिनेश चव्हाण  भास्कर चव्हाण  बाळासाहेब देवकर   सुलभा  भोसले  विशाल  पाटील   आरती  परजणे  रतन पिंगट   रेणुका हजारे  वंदना पाटील  अनुपमा तवर  शैलेंद्र भणगे  केशव सुर्यवंशी  नागनाथ बदोले  सुषमा सहस्त्रबुध्दे  धनंजय जगताप  चंदन तरवडे  मंजुषा अहिरराव   ज्ञानेश्वर काळे  रजनी लुंगसे  रावसाहेब राशीनकर   स्वाती लकारे   बालाजी थिटे  हनुमंत येवले  बालाजी नाईकवाडी  लक्ष्मीकांत बिराजदार  शबाना तांबोळी  सुरेश पेहरकर  मिना जेजुरकर  श्रीशैल सुतार  ज्योती अवघडे  बाबासाहेब दाभाडे  कल्पना अंबुलकर  वर्षा शिंदे  शिल्पा जैन  राजश्री वाणी  माधव खलानेकर  सुनील तोरणे  ज्ञानेश्वर शिंदे आदीं कवी कवयित्रीचा सहभाग होता.
      ओळख कवी -कवयित्रीची  या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील नवोदित तसेच जेष्ठ कवी कवयित्रीनी समूहाने आवाहन केल्याप्रमाणे स्वतः ची कविता फोटो आणि अल्प परिचय पाठविलेला होता. त्या सर्वांचे कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी एकत्रित ग्राफिक्स करून समुहात कवी पंडित निंबाळकर  दररोज एक याप्रमाणे कवी-कवयित्री ची ओळख आणि ग्राफिक्स सादर करत असत. दिवसभर त्या कवितेला समुहात सदस्यांकडून असंख्य प्रतिक्रिया मिळत असत, तसेच सदर कवितेचे समुहात समीक्षण देखील होत असत. समुहाबाहेर देखील कविता व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक अकाऊंट, स्टोरी, फेसबुक पेज, इंस्टाग्राम या सर्व ठिकाणी सदर ग्राफिक्स केलेले पेज पोस्ट करत असल्याने ज्या कवी - कवयित्रीची कविता सदर दिवशी असेल त्यास वाचकांकडून प्रतिक्रियांचा प्रचंड वर्षाव सुरू असायचा. फेसबुक, व्हाटस् अप आणि इंस्टाग्राम या सर्व ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी आपली कविता अनेकांकडून व्हायरल होत असल्याने येणाऱ्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामुळे होणार आनंद आणि मिळणारी प्रेरणा यांना पारावर नसतो अशा अनेक भरभरून प्रतिक्रिया कवी- कवयित्री यांनी आपल्या मनोगतात समुहात सांगितले आहे.
           अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला आणि अनेकांना आपल्याकडे आकर्षित करणारा हा  ओळख कवी-कवयित्रीची  उपक्रम ठरला असून त्याची सांगता झाली असली तरी हा उपक्रम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी अनेक कवी- कवयित्री वारंवार करत असल्याने याच उपक्रमाचा दुसऱ्या टप्प्याचा विचार सुरू असून त्याचा निर्णय आणि नियोजन झाल्यावरच दुसऱ्या टप्प्याकडे आपण पुन्हा नव्या जोमाने वळणार असल्याचे समूह प्रमुख कवी ज्ञानेश्वर शिंदे व कवी पंडित निंबाळकर यांनी सांगितले आहे.
        सोशल मीडियाचा वापर करून अनेक नवोदित तसेच जेष्ठ कवी-कवयित्रीना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, आपले साहित्य आपल्या डायरी पुरते किंवा स्वतः पुरते मर्यादित न राहता ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे, साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, कविता जगावी, टिकावी आणि वाढावी यासारख्या उदात्त हेतूने निःशुल्क, निःस्वार्थ भावनेने हे साहित्य सेवेचे छोटेसे कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या नाते शब्दांचे साहित्य मंच  या व्हॉट्स अप समूहाच्या माध्यमातून करत असल्याचे समूह प्रमुख व ग्राफिक्सकार कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले आहे.