Breaking News

नागपूरात भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण !

 Coronavirus Outbreak: Two test positive in Mumbai and Ulhasnagar, total  corona cases rise up to 47

नागपूर । नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व भाजपचे विधान परिषद आमदार डॉक्टर परिनय फुके यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कुठलेही लक्षणे नाहीत. यापूर्वी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. सोबतच भाजपचे विधान परिषद आमदार डॉक्टर परिनय फुके यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती स्वतः फुके यांनी दिली. गेल्या आठवड्यात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात त्यांनी पाहणी दौरा केला होता. त्यावेळी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. फुके यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. गेल्या 15 दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन फुके यांनी केले आहे.