Breaking News

जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान तलवारबाजी

 


औरंगाबाद। मोंढ्यातील आठ एकर जागेच्या कारणावरून जाफरगेट चौकात दोन गटात वाद झाला. त्यानंतर फिल्मी स्टाईलने तलवारी व लाठ्या-काठ्या घेउन समोरासमोर भिडल्याने आठवडी बाजारात एकच गोंधळ उडाला. मारहाणीत दोन महिलांसह आठ जण जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

मोंढ्यातील जाफर गेटजवळ कादर शहा अवलीया दर्ग्याची जमीन आहे. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मोंढ्यातील चौकाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जमिनीच्या वादावरून मुश्ताक बिल्डर आणि कटकट गेट येथील अलीम खान यांचे टोळके समोरासमोर भिडले. तलवारी आणि लाठ्या-काठ्याने एकमेंकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला आणि रविवारच्या बाजारात एकच धावपळ सुरु झाली. अचानक हल्ला सुरु झाल्याने मुश्ताक बिल्डर यांच्या समर्थकांनी तेथून पळ काढला. मात्र दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवून हल्ला केला. यात दोन महिलांसह आठजण जखमी झाले. हा हल्ला पूर्वनियोजित असावा, असा संशय आहे.