Breaking News

कोपरगाव तालुक्यात १६ रुग्णाची वाढ तर ३९ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात १६ रुग्णाची वाढ तर ३९ कोरोनामुक्त
---------------
वारी मध्ये आज परत एकाचा मृत्यू




करंजी/प्रतिनिधी :
आज दि. २९ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १७८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ बाधित तर १६५ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर नगर येथील अहवालात १ तर खाजगी लॅब च्या अहवालात २ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

समतानगर - १
मेन रोड - १
मोहिनीराज नगर - १

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

संजीवनी - ४
माहेगाव देशमुख -४
वारी - १
शिंगणापूर - १
मूर्शतपूर - १
मंजूर - १
कासली - १

असे आज २९ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १६ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १८०७ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४१ झाली आहे.

 आज रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी येथील ६० वर्षीय महिलांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३२  झाली आहे.