Breaking News

नाशिक विभागाचे मुख्य विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले शरदचंद्रजी पवार साहेब कोविड केअर सेंटर व व्यवस्थापन कमीटीचे तोंडभरून कौतुक !

नाशिक विभागाचे मुख्य विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले शरदचंद्रजी पवार साहेब कोविड केअर सेंटर व व्यवस्थापन कमीटीचे तोंडभरून कौतुक

प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वागतपारनेर प्रतिनिधी- 
     नाशिक विभाग मुख्य आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक विभाग,यांची शुक्रवारी मा. शरदचंद्रजी पवार  कोवीड केअर सेंटरला भेट देत प्रशासकीय यंत्रणा आरोग्य विभाग व केअर सेंटर व्यवस्थापन समितीची आढावा घेतला . यावेळी त्यांनी कोविड सेंटर मध्ये होत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले रुग्णांना वेळोवेळी देण्यात येत असणाऱ्या विविध सेवा बाबत पाहणी केली रुग्णांना देखील त्यांनी विचारपूस केली यावेळी  उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले  पारनेरच्या तहसीलदार सौ.ज्योती देवरे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे अशोकराव सावंत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजीशेठ तरटे,सुवर्णाताई धाडगे,नगरसेवक नंदकुमार देशमुख,किसनदादा गंधाडे,बाळासाहेब खिलारी,अंकुश पायमोडे पत्रकार शरद झावरे यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी मित्र, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते यावेळी गमे यांनी पारनेर तालुक्यातील शरद चंद्र पवार आरोग्य मंदिरास पाहणी करत तेथील सर्व रुग्णांना मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले तसेच तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा  आढावा घेतला त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने चांगल्या पद्धतीने उपयोजन केल्या असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले तालुक्‍यात प्रशासनाला राजकीय पातळीवर देखील चांगले योगदान व मदत मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.