Breaking News

रेल्वे पोलीस सापडला नाही निसर्गाच्या सामर्थ्या पुढे एनडीआरएफ ने टेकले हात !

रेल्वे पोलीस सापडला नाही निसर्गाच्या सामर्थ्या पुढे एनडीआरएफ ने टेकले हात !
---------------
गणेश दहिफळे हा गेल्या 48 तासापूर्वी झाला होता बेपत्ता
--------------
प्रशासनाने अथक प्रयत्न केले मात्र यश आले नाही अखेर 48 तासानंतर मोहीम थांबवली


पारनेर प्रतिनिधी - 
    तालुक्यातील रुई चोंढा या डोहामध्ये रेल्वे पोलीस गणेश दहिफळे याचा गेल्या दोन दिवसापासून शोध घेण्याचे काम प्रशासन प्रयत्न करत होते मात्र त्याला यश न आल्याने अखेर एनडीआरएफच्या तुकडीला तहसीलदार ज्योती यांनी पाचारण केले त्यानुसार हि 18 जणांची तुकडी सकाळी 9 वाजता घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू


सकाळी 9 वाजता एनडीआरएफ चे पथक रुई चोंढा येथे पोहचले  दोन गोताखोर खोल असलेल्या डोहा त बुडी घेऊन शोध घेतला धबधबा असल्याने प्रवाह व उडणारे शावर यामुळे त्यांना खुप अडचणी येत होत्या त्यामुळे अखेर हि मोहीम तहसीलदार ज्योती देवरे व एनडीआरएफ इन्स्पेक्टर मनोज कुमार यांनी थांबवली.
गेल्या 40 तासाहून जास्त काळ डोहात पडलेल्या रेल्वे पोलीस गणेश दहिफळे याचा शोध प्रशासन व स्थानिक लोक घेत होते मात्र अथक प्रयत्न करूनही गणेश सापडला नाही एनडीआरएफ च्या दोन गोताखोरा सह 16 जणांचे पथक सुमारे 6 तास शोध घेत होते ते अनेक वेळा तेथील असणाऱ्या पाण्याच्या भावऱ्यात वढले जात होते तरीही त्यांनी अथक प्रयत्न केला मात्र दहिफळे याचा मृतदेह सापडला नाही.


 रेल्वे पोलीस गणेश दहिफळे 23 रोजी दुपारी 3 वाजता या परिसरातून गायब झाला होता फोटो काढण्याच्या नादात तो दोघांमध्ये पडला आहे असे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे त्यानुसार प्रशासनानं शोधमोहीम सुरू केली या परिसरात पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध घेण्यास अनेक अडथळे पथकांना निर्माण होत होती वेगवेगळ्या या पथकांनी युद्धपातळीवर शोधाशोध केली.
रुई चोंढा डोहामध्ये बुडालेला रेल्वे पोलीस गणेश दहिफळे वय 30 हा आठ वर्षापूर्वी रेल्वे पोलीस मध्ये भरती झाला होता तीन वर्षांपूर्वी गणेश चे लग्न झालेले असून त्याला दोन वर्षाचा मुलगा आहे गणेश दहिफळे हा मूळचा मालेगाव चकला ता शिरूर कासार जिल्हा बीड येथील आहे.
घटनास्थळी तहसीलदार ज्योती देवरे पोलीस निरीक्षक राजेश गवळी इन्स्पेक्टर मनोज कुमार आदी उपस्थित होते.
   रेल्वे पोलीस गणेश दहिफळे याचा शोध घेण्याचे एनडीआरएफ पथकाने अथक प्रयत्न केले मात्र धबधब्या्चा जोर प्रचंड असल्याने व ७० फुट खोल व रांजणखळग्यासारखे आकार  असल्याने पाणबुडे गॅस सिलेंडरसह फेकले जाऊन तिथे स्थिर होऊन शोध मोहिमेला अडचणी आल्या. मेजर मनोजकुमार यांचे नेतृत्वाखाली १८ जणांचे पथक ६ तास शोध मोहिम करण्यात आली. पाणबुडे  यांनी खाली डोहामध्ये शोध घेतला. त्यावेळेस त्यांना बाजूने कपारी असल्याने त्याचा सिलेंटर अडकण्याची शक्यता होती  तसेच एकदा एका पाणबुड्यांच्या संपर्क काही वेळ तुटला त्यानंतर त्याला वर काढले व पुन्हा शोध मोहीम सुरू केली तरीही शोध लागला नाही अखेरीस पाणबुड्यांना वरती बोलवण्यात आले.व शोध माहीम थांबवण्यात आले आहे अशी माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.