Breaking News

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा कळस व पारनेर शहरातून शुभारंभ !

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा कळस व पारनेर शहरातून शुभारंभ !
----------------
 तालुक्यातील सर्व गावांमध्ये राबवली जाणार माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोना मुक्त महाराष्ट्र मोहीम तहसीलदार ज्योती देवरे.
---------------
कळस व पारनेर शहरात या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


 पारनेर प्रतिनिधी- 
     माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोना मुक्त महाराष्ट्र या मोहिमेची सुरुवात पारनेर  तालुक्यातील कळस या ठिकाणी करण्यात आली यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही मोहीम राज्यभर राबविण्याच्या सूचना केल्या आहे या धर्तीवर पारनेर तालुक्यातील गावांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे तहसीलदार ज्योती देवरे यांनी मोहिमेचा शुभारंभ कळस येथून केला यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे आदी उपस्थित होते.


कळस येथे या मोहिमेअंतर्गत कोरोना संशयित ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली ज्या रुग्णांना त्रास होत आहे त्यांच्या चाचण्या यावेळी करण्यात आल्या तसेच गाव पातळीवर जनजागृती मोहीम राबवण्यात आली या योजनेच्या माध्यमातून शोधा संपर्क करा व उपचार द्या हि त्रिसूत्री गाव पातळीवर राबविण्यात आली तसेच कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली यामध्ये गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील सहभाग नोंदवला.
दरम्यान पारनेर शहरातील नगरपंचायत च्या वतीने या मोहिमेचा शुभारंभ शहरातील गणपती गल्ली येथे करण्यात आला यावेळी येथील नागरिकांची आरोग्य तपासणी आरोग्य विभाग व नगरपंचायत च्या वतीने करण्यात आली तसेच येथील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती माहिती दिली गेली यावेळी नगराध्यक्षा वर्षा नगरे मुख्याधिकारी डॉ.सूनिता कुमावत नगरसेवक नंदकुमार देशमुख डॉ.अजित लंके डॉ. संदीप औटी डॉ.उंदरे मॅडम विजय डोळ आदी नागरिक उपस्थित होते.


या मोहिमेला कळस व पारनेर शहरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे तालुक्यातील सर्वच गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे या माध्यमातून कोरोना आला आळा घालण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जाणार आहे यामध्ये तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचा सहभाग असणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.