Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो, मुख्यमंत्री योगी

 लखनऊ : 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्रामध्ये बनत असलेल्या मुघल म्युझियम चे नाव बदलण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री योगी सोमवारी म्हणाले आग्रामध्ये बांधल्या जात असलेल्या म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाणार. ताजमहलच्या पूर्वेला गेटवर बनत असलेले हे संग्रहालय तब्बल १५० कोटींचे प्रोजेक्ट आहे.

उत्तर प्रदेशचे सरकार राष्ट्रवादी विचारांना पोषण देणारी आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले, गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतीक चिन्हांना सोडून देशाप्रती गौरव निर्माण करणाऱ्या विषयांना चालना देण्याची गरज आहे. आमचे हिरो मुघल असू शत नाही. सीएम योगी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश

मुख्यमंत्री योगी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रमुख सचिव पर्यटन जितेंद्रकुमार यांना यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार आग्रामध्ये बनत असलेल्या या म्युझियममध्ये मुघलकालीन वस्तू तसेच कागदपत्रे इतर गोष्टी असणार आेत. याशिवाय यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाश संबंधित वस्तूंचाही यात समावेश असेल.

पर्यटकांसाठी खास तजवीज करण्याचे आदेश

उत्तर प्रदेश सरकारनेया म्युझियमच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवाची साऱ्या जगाला ओळख व्हावी असे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्युझियममध्ये मराठा सम्राज्याच्या कालखंडातील सर्व वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर्यटकांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचेही आदेश दिले आहेत.