Breaking News

रेल्वे पोलीस गणेश दहिफळे यांचा मृतदेह वासुंदे येथील ठाकरवाडी परिसरामध्ये आढळला !

रेल्वे पोलीस गणेश दहिफळे यांचा मृतदेह वासुंदे येथील ठाकरवाडी परिसरामध्ये आढळला !
-------------
मृतदेह नदी द्वारे वाहून गेल्यामुळे रुई चोंढा धबधब्यापासून सहा किलोमीटरवर आढळला !
--------------
 शोधमोहीम प्रशासनाने थांबवल्यानंतर मृतदेह आढळल्याची बातमी वासुंदे ग्रामस्थांनी कळवली
----–----------
अखेर 50 तासानंतर मृतदेह बंधाऱ्याच्या खाली सापडला


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर येथे रुई चोंढा धबधब्यातून बेपत्ता झालेल्या रेल्वे पोलीस गणेश दहिफळे याचा मृतदेह वासुंदे येथील शिक्रीजवळील ठाकरवाडीत परिसरातील बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस आढळून आला येथील ग्रामस्थांनी माहिती कळवली त्यावरून पोलीस पथक तेथे दाखल झाले आहे.
     गेल्या तीन दिवसापासून पोलिसाला शोधण्यासाठी प्रशासनाने अथक प्रयत्न केले नगर वरुन पथके बोलावण्यात आली काल दिवसभर त्याचा शोध न लागल्यामुळे आज सकाळपासून एनडीआरएफच्या टीमने शोध घेतला मात्र त्यांनाही यश आले नाही त्यानंतर काही वेळातच हा मृतदेह ठाकरवाडी परिसरामध्ये आढळून आला या परिसरामध्ये हा मृतदेह या धबधब्यापासून वाहत असलेल्या नदी द्वारे वाहून आला असल्याची माहिती समजते मृतदेह या धबधब्यातून रात्रीच्या वेळी बाहेर पडला असून तो पाण्याच्या प्रवाहात पाच ते सहा किलोमीटर वाहत गेला असण्याची शक्यता आहे ५० तासानंतर दहिफळे सापडला त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.


    आज सकाळी 9 वाजता एनडीआरएफ चे पथक रुई चोंढा येथे पोहचले दोन गोताखोर खोल असलेल्या डोहा त बुडी घेऊन शोध घेतला धबधबा असल्याने प्रवाह व उडणारे शावर यामुळे त्यांना खुप अडचणी येत होत्या त्यामुळे अखेर हि मोहीम तहसीलदार ज्योती देवरे व एनडीआरएफ इन्स्पेक्टर मनोज कुमार यांनी थांबवली. त्यानंतर हा मृतदेह सापडला गेल्या 40 तासाहून जास्त काळ डोहात पडलेल्या रेल्वे पोलीस गणेश दहिफळे याचा शोध प्रशासन व स्थानिक लोक घेत होते मात्र अथक प्रयत्न करूनही गणेश सापडला नाही एनडीआरएफ च्या दोन गोताखोरा सह 16 जणांचे पथक सुमारे 6 तास शोध घेत होते ते अनेक वेळा तेथील असणाऱ्या पाण्याच्या भावऱ्यात वढले जात होते तरीही त्यांनी अथक प्रयत्न केला 
    रुई चोंडा धबधब्या परिसरातील शोधमोहीम प्रशासनाने थांबवल्यानंतर काही वेळातच वासुंदे येथील ठाकरवाडी परिसरामध्ये बंधाऱ्याच्या खाली मृतदेह आढळून आल्या असल्याची माहिती समजली त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे तसेच पोलिस निरीक्षक राजेश गवळी हे घटनास्थळी रवाना झाले त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.