Breaking News

राहूरीत कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढली ; आता लॉकडाऊन अटळ !

राहूरीत कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढली ; आता लॉकडाऊन अटळ !


राहुरी शहर प्रतिनिधी :
    राहुरी शहरासह तालुक्यात नागरिकांनी जरी कोरोना महामारी ला गंभीरतेने घेतले नसले तरी कोरोनाने मात्र गंभीर पणे घेतल्याचे चित्र असून गेल्या पाच दिवसात 171 बाधित रुग्णांची भर पडत एकूण रुग्ण संख्या 631 वर पोहोचली आहे.
     राहुरीकरांनी 13 मार्च पासून पाच महिने लोक डाऊन ला चांगला प्रतिसाद दिला . मात्र अखेर एक जुलै रोजी राहुरी तालुक्यात कोरोना ने शिरकाव केला . एक जुलै ते 31 जुलै या एक महिन्यात तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 79 इतकी झाली , तर एक बळी गेला . राहुरीकरांनी ही बाब गंभीरतेने घेणे आवश्यक बनले . मात्र ऑगस्ट महिन्यात कोरोना महामारी ने कहरच केला . 1 ते 15 ऑगस्ट या पंधरा दिवसात 133 रुग्ण वाढले तर 16 ते 31 ऑगस्ट या काळात तब्बल 238 रुग्णसंख्या वाढली .ऑगस्ट महिन्यात 31 दिवसात 14 रुग्णांचा मृत्यू झाला.
     यापेक्षा जास्त 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या पाच दिवसात 171 बाधित रुग्ण वाढले तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे . कोरोणाने गंभीरतेने घेतले याचेच दृश्य सध्या पहावयास मिळत असून राहुरी शहरासह तालुक्यातील नागरिकांकडून नियमांची पायमल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . मास्क वापरणे , अंतर राखणे ,सेनीटायझर चा वापर करण्याचा नियमांचा जणू विसर पडल्याचे चित्र आहे.
कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार व राज्य शासनाकडून केलेल्या आदेशानुसार तालुकास्तरावर प्रतिजन चाचणी अर्थात चाचण्यांना एक ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे . 
      जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार तालुका आरोग्य विभागाने दररोज किमान शंभर चाचण्या करण्यात तसे चाचण्यांच्या किड्स देखील उपलब्ध करून दिले . आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात 2849 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील २३७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत , तर उर्वरित 2642 नेगेटिव अहवाल आले . जुलैअखेर 535 जणांचे घेण्यात आले होते जुलैअखेर 38 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते चाचण्यांमुळे होणाऱ्या संसर्गाच्या साखळी तोडण्यास मदत होत आहे.
5 सप्टेंबर पर्यंत एकूण रुग्ण संख्या 631 तर पूर्ण बरे झालेले 397 संख्या आहे . 
     सध्या 212 जणांचा उपचार व सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे . रुग्ण बरे होण्याचा 62.91% इतका आहे . मात्र गेल्या दहा-बारा दिवसापासून भाजी मार्केट , वित्तीय संस्था ,शासकीय कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे . ही साखळी तोडण्यासाठी दहा -बारा दिवसांच्या लोक डाऊन व जनता कर्फ्यू ची आवश्यकता असून त्यासाठी शासकीय व राजकीय मंडळी कडून सकारात्मक भूमिकासमोर ठेऊन काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .