Breaking News

कोपरगाव ची बाजारपेठ संध्याकाळी सात पर्यंत खुली राहणार -तहसीलदार

कोपरगाव ची बाजारपेठ संध्याकाळी सात पर्यंत खुली राहणार -तहसीलदार


करंजी प्रतिनिधी-
  महाराष्ट्रात अजूनही कोरोना रुग्णाची संख्या वाढतांना दिसून येत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र्तील  लॉकडाउन शासनाने ३० सप्टेंबर पर्यंत काही अटी शर्थी च्या आधारे वाढविला असून तसे परिपत्रक देखील जाहीर केले आहे.
 
   याच आधारावर अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर जिल्ह्यातील सर्व आस्थापने (दुकाने) सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत प्रशासनाच्या सोशल डिस्टनसिंग च्या नियमात सुरू राहतील असे आदेश काढले असून त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरातील देखील सर्व आस्थापने सकळी ९ ते ७ या वेळेत खुली राहतील अशी माहिती कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली असून पुढील आदेश येई पर्यंत कोपरगाव शहरातील जनता टाळेबंदी कायम असेल असे तहसीलदार यांनी  सांगितले.