के. जे. सोमैया विद्यालयात कौशल्याधिष्ठित पदवी पदविका अभ्यासक्रमास मंजुरी. कोपरगाव / तालुका प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोग नवी ...
के. जे. सोमैया विद्यालयात कौशल्याधिष्ठित पदवी पदविका अभ्यासक्रमास मंजुरी.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क अंतर्गत येथील के . जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास चालू शैक्षणिक वर्षापासून हेल्थ केअर/ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी , आय. टी. / केमिकल अँड पेट्रोकेमिकलस / इंडस्ट्रियल केमिस्ट्री व मल्टिमीडिया अँड ग्राफिक्स डिझाईन हे कौशल्याधिष्ठित पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी. एस. यादव यांनी येथे दिली.
डॉ. यादव पुढे म्हणाले की," नॅक या बंगलुरु स्थित भारत सरकारच्या समितीने महाविद्यालयास लागोपाठ दुसऱ्यांदा 'अ' श्रेणी मानांकन दिल्यानंतर ही संस्था व महाविद्यालयाचा कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणखी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस होता व त्या अनुषंगाने आमचे सतत प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळाल्याचे समाधान आहे. यासाठी आम्हाला को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोक आण्णा रोहमारे, सचिव ऍड. संजीव दादा कुलकर्णी व सदस्य श्री संदीपजी रोहमारे यांचे सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असते, त्याचेच हे फळ असल्याचेही प्राचार्य डॉ. यादव म्हणाले. याबद्दल संस्थेने प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, नॅक समन्वयक डॉ. एस. आर. पगारे, आय. क्यू. ए. सी. प्रमुख प्रा. व्ही. सी ठाणगे, डॉ . जी. के. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक डॉ . ए. सी. नाईकवाडे , श्री. संजय पाचोरे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.