Breaking News

के.के.रेंज संदर्भात गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीमध्ये होणार बैठक !

के.के.रेंज संदर्भात  गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीमध्ये होणार बैठक !
-----------
मा.शरद पवार यांच्या बरोबर आ.निलेशजी लंके,राहुल झावरे सह राहुरी व नगर तालुक्यातील शिष्टमंडळ आमंत्रित !


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर नगर व राहुरी तालुक्यातील तेवीस गावे हे के.के.रेंज अधिग्रहण कक्षात येत असल्या कारणाने व लष्कराच्या अधिकारी व गाड्या गेले काही दिवसापासून या परिसरात फिरताना दिसत असल्यामुळे या गावातील नागरिकांचे जनजीवन अस्थिर झाले आहे. त्यासंदर्भात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे बाधित 23 गावाचे प्रतिनिधीत्व करत के.के. रेंजच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत.व त्या संदर्भात आमदार लंके यांनी वारंवार वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत अनेक वरिष्ठ नेते मंडळींशी चर्चाही केली आहे.त्या संदर्भात वनकुटा गावचे सरपंच ॲड. राहुल झावरे,राहुरीचे सभापती अण्णा सोडणर, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांचे शिष्टमंडळ सोमवारी खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहे. 
       खासदार शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेऊन आमदार लंके व सहकाऱ्यांनी के.के. रेंज संदर्भात सविस्तर चर्चा केली व देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची गुरुवारी सतरा सप्टेंबर रोजी भेट घेणार आहेत. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ह्या प्रश्नाबाबत आग्रहाची भूमिका घेतली आहे.कोणत्याही परिस्थिती मध्ये हा प्रकल्प आपल्याला परवडण्यासारखं नाही या भागातील बागायत क्षेत्र मुळा ड्याम,काळू प्रकल्प ह्यामुळे या भागात बागायती शेती झालेले आहे. तसेच सविस्तर सर्व प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना भेटून सदर परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देऊ असे खासदार शरद पवार यांनी आश्वासित केले.
      कर्जुले हर्या तालुका पारनेर येथील आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले शरदचंद्रजी पवार साहेब कोविड केअर सेंटर कामाबाबत व कोरणा बाधित रुग्णांना स्वखर्चाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबाबत शरद पवार साहेबांनी आ.लंके तोंड भरुन कौतुक केले.कोरोना महामारीचे संकट असल्या पासून गेले सहा-सात महिन्यापासून आमदार लंके के मतदारसंघात व संघाबाहेरीलही जनतेची योद्धा बनवून जी काळजी घेतात त्यांचे हे सामाजिक कार्य मला पक्षातील व पक्षा बाहेरील अनेक मान्यवर मंडळींनी यापूर्वीही सांगितले आहे.निलेशराव तुमच्या या सामाजिक कार्यासाठी तुम्ही जे योगदान देत आहेत व हे सेंटर समाजहिताचे काम करत आहे.तुमचे काम हे वाखावनण्या सारखे आहे असे खासदार शरद पवार यांनी यावेळी सांगितले .

 पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ज्ञात असतानाही या तालुक्यात जिरायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात येत आहे.तरीपण  आपण एवढे सुख सुविधा देता तुमचं कार्य आर.आर. आबा सारखे महान आहे.असे गौरवोद्गार खासदार शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी यावेळी काढले.
 शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राहुरी येथील कै.शिवाजीराजे गाडे यांची आठवण काढत सर्वसामान्य माणूस अचानकपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीत निघून गेला ही खंत नक्कीच आहे.असे सांगत खासदार शरद पवार यांनी कै.शिवाजीराव गाडे यांच्या आठवणींना उजाळा दिला .