Breaking News

कुटुंब सुरक्षित राहिलं तर गाव सुरक्षित राहील- माजी सरपंच विजय पवार

कुटुंब सुरक्षित राहिलं तर गाव सुरक्षित राहील- माजी सरपंच विजय पवार
--------------
सुपा येथे करण्यात आली कुटुंबांची आरोग्य तपासणी!


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यांतील सुपा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे ची सुरुवात प्रशासक सचिन चौधरी यांनी केली या अंतर्गत सुपा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी या नागरिकांना माजी सरपंच विजय पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार सुपा येथे मोठी लोक वसाहत आहे तसेच सुपा येथे औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक कारखाने व उद्योग धंद्यात मुळे व कामानिमित्त बाहेर पडतात त्या दृष्टीने त्यांनी आपल्या आरोग्याची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे जर कोरोना पासून कुटुंब सुरक्षित राहिलं तर गाव सुरक्षित राहील त्यामुळे प्रत्येकाने त्यासाठी पुढाकार घ्यावा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर त्वरित आरोग्य विभागाशी व सुपा ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधावा असे आवाहन माजी सरपंच विजय पवार यांनी केले.
 सुपा येथे आरोग्य तपासणी करण्यासाठी पथके नेमली आहेत दररोज ही पथके ठरवून दिलेल्या कुटुंबांची पाहणी करणार आहेत या तपासणीमध्ये ज्यांना लक्षणे आढळून येतील त्यांची कोरोना चाचणी त्वरित करण्यात येणार आहे.
यावेळी सचिन पवार किरण पवार दीपक पवार सचिन काळे मनोज बाफना शरद पवार अमोल पवार अक्षय थोरात अमोल मोकाते जब्बार शेख प्रशासक सचिन चौधरी ग्राम विकास अधिकारी नागवडे आरोग्य अधिकारी डॉ.विद्या बारवकर आरोग्य सेविका अंजली वर्पे आशा सेविका योगिता पवार अनिता सुपेकर उज्वला बढे रेखा साळुंके शारदा गायकवाड मुमताज शेख आदी उपस्थित होते.