Breaking News

निघोज येथील मळगंगा विद्यालयातील कॉम्प्युटरची चोरी !

निघोज येथील मळगंगा विद्यालयातील कॉम्प्युटरची चोरी !


पारनेर प्रतिनिधी-
     पारनेर तालुक्यातील मळगंगा विद्यालय निघोज या विद्यालयात असणारे दोन कॉम्प्युटर दरवाजा तोडून चोरांनी चोरून नेले याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती रेखाबाई दिना हराळ वय 47 धंदा नोकरी राहणार निघोज तालुका पारनेर,जिल्हा अ. नगर यांनी विद्यालयातील संगणक कक्ष साफसफाई व पावसाचे पाणी शिरले अगर कसे खात्री करण्यासाठी उघडली असता कक्षातील कुलूप तुटलेली व दरवाजा अर्धवट उघडा होता व 17,800 रुपये किमतीचे तीन कॉम्प्युटर (मॉनिटर), दोन कीबोर्ड, दोन वेब कॅमेरा, दोन माऊस, दोन वायरलेस माऊस, कीबोर्ड आदी साहित्य चोरांनी चोरून नेले होते याबाबत श्रीमती रेखाबाई हराळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. व्ही. एस. लोणारे करत आहेत.