Breaking News

कोपरगांव कोविड केअरला लाँयन हार्ट ग्रुप कडून फळांचे वाटप !

कोपरगांव कोविड केअरला लाँयन हार्ट ग्रुप कडून फळांचे वाटप


करंजी प्रतिनिधी-
कोपरगांव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित सर्वसामान्य जनतेला वरदान ठरत असलेल्या श्री सदगुरु गंगागिर महाराज महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला रुग्णांना लाँयन हार्ट ग्रुप कडून तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे,स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांचे प्रमुख उपस्थितीत फळांचे वाटप करण्यात आले.
कोपरगांव कोविड केअर सेंटरला अनेक सेवाभावी संस्था व कोरोना संसर्गातून येथील कोविड केअर मधून बरे झालेल्या रुग्नांनी मदतीचा हात पुढे केला आहे. याचाच एक भाग म्हणून लाँयन हार्ट नावाच्या महाविद्यालयीन तरुणांच्या ग्रुपने स्वताच्या वाढदिवस पार्टीचे साचवलेल्या पैशातून कोपरगांवच्या कोविड केअर सेंटरला पौष्टिक आहार म्हणून दोन पोती फळे भेट दिली आहे.
या उपक्रमात लाँयल हार्ट ग्रुपचे ऐश्वर्या बोरावके,रिध्दी दौंड,सार्थक काशिद,सत्येम बोरावके,ईशा कोल्हे,सायली ईनामके यांनी सहभाग घेतला आहे. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसिलदार योगेश चंद्रे यांनी या तरुणांच्या सामाजिक बांधिलकी बद्दल प्रशासनाच्या वतीने आभार मानले आहे. या मुलांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.