Breaking News

गोदावरी नदीत आढळले अनोळखी इसमाचे प्रेत !

गोदावरी नदीत आढळले अनोळखी इसमाचे प्रेत


गंगापूर/प्रतिनिधी :
नगर-औरंगाबाद सीमेजवळ वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील शिवाजी भणगे यांच्या शेताजवळील नदीपात्रात वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहितीही अमळनेरचे पोलीस पाटील साळवे यांनी गंगापूर पोलीस स्टेशन चा दिल्यावरून गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता युवक पाण्यात तरंगताना आढळून आला त्य बाहेर काढून बघितले असता सावळ्या वर्णाचा २० ते २५ वर्ष वयाच्या १७० सें.मी. उंची मध्यम बांधा अंगात लाल रंगाचा खिशावर इंग्रजी S  लिहिलेला शर्ट तसेच काळ्या रंगाची नाईट पॅन्ट खिशात पांढऱ्या रंगाचा इंग्रजीतून लाल शाईने  Sachin लिहिलेला रुमाल आढळून आला सदर युवकास तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले असून सदर वर्णनाच्या युवका बद्दल कोणास माहिती असल्यास अथवा ओळखीचा असल्यास गंगापूर पोलिस स्टेशनला ०२४३३-२२१३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी केले आहे