Breaking News

शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण !

शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण
------------
फार्मसी कॉलेज चे प्राचार्य व शिक्षक उपस्थित


करंजी प्रतिनिधी-
 जागतिक फार्मसी दिन व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले.
   
   माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे व संजीवनी शैक्षणिक संस्थेचे नितीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक फार्मसी दिन व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत संजीवनी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य साळुंखे सर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
    या प्रसंगी प्रा. पटेल सर,  प्रा. पटेवार सर, प्रा. कुर्हे, प्रा. डी. एन. पटेल, प्रा. पवार, शिंगणापूर चे भीमा संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, दिलीप इंगळे, दत्तात्रय संवत्सरकर, ग्रामविकास अधिकारी जे के शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.