Breaking News

टाकळी ढोकेश्वर येथे घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास !

टाकळी ढोकेश्वर येथे घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास !


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून सोन्याचे दागिने सह रोख रक्कम असा 63 हजार रुपयांचा मुद्देमाल घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबतची फिर्याद पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संदीप साहेबराव देठे वय 28 राहणार टाकळी ढोकेश्वर यांनी दिली आहे त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 28 रोजी 4 ते 7:30 च्या दरम्यान संदीप साहेबराव देठे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून12000 किमतीचे एक सोन्याचे गंठण एक तोळा वजनाचे 30000 किमतीचे 1 सोन्याच्या मण्यांची माळ 16 ग्रॅम वजनाची16000 सोन्याची कानातील फुले आठ ग्रॅम वजनाची 5000 रोख रक्कम त्यात 500 रुपये किमतीच्या 6 नोटा व 100 रुपये किमतीच्या 20 नोटा असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायदा करिता बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली आहे. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. एस के कदम ते करत आहेत.