Breaking News

कान्हूर पठार येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई, कलम १८८ नुसार गुन्हे दाखल !

कान्हूर पठार येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई.कलम १८८ नुसार गुन्हे दाखल!
-----------
कान्हूर पठार चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक विनामास्क वावरत असतात.
----------
पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम घेतली हाती.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे या धरतीवर पोलीस प्रशासनाने विना मास्क नागरिकांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे कान्हुर पठार येथे आज सकाळीच अनेक ग्रामस्थ चौकामध्ये विना मास्क फिरत होते तसेच चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती यावेळी पोलिसांनी येथे धडक कारवाई केली अनेक नागरिकांची यावेळी धावपळ उडाली या नागरिकांवर 188 नुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.


पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ११०० वर पोहचली आहे. तालुक्यातील कान्हूर पठार जवळे निघोज टाकळीढोकेश्वर सुपा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होताना दिसत आहे या गावात कोरोना चा समूह संसर्ग होत असताना नागरिकांचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिक चौकाचौकांमध्ये गावात गर्दी करताना दिसून येत आहेत तसेच अनेक नागरिक सोशल डिस्टन्स व मास्क चा वापर करत नाहीत त्यांच्यावर पारनेर पोलिसांनी धडक कारवाई स सुरुवात केली आहे तालुक्यातील इतरही गावांमध्ये ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे तालुक्यातील नागरिकांनी यापुढे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर कलम १८८ नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती गवळी यांनी दिली आहे आज कान्हूर पठार येथून या कारवाईत सुरुवात झाली असून तालुक्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे .