Breaking News

नेवासा सबरजिस्टारचा 'कारभारचा' नावाला सरकारी अधिकाऱ्यांकडे माञ सुञधार बनले दलालच !

नेवासा सबरजिस्टारचा 'कारभारचा' नावाला सरकारी अधिकाऱ्यांकडे माञ सुञधार बनले दलालच !


नेवासा तालुका प्रतिनिधी
       नेवासा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी असलेल्या (सब रजिस्ट्रार) या मुख्य कार्यालयात सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडाला असून कार्यालायत कोरोना या महाभयंकर रोगाबाबत कोणतीच उपयोजना केली जात नसल्यामुळे या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या जनतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या कार्यालयीतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तोंडालाही मास्क लावलेले दिसत नाही तसेच बाहेरुन आलेल्या लोकांना देखील कोणतीच उपयोजना या कार्यालायत केली जात नसल्याने सर्वसामान्य जनतेतून सबरजिस्टार कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर  आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे. याकार्यालयात लोकांची मोठी गर्दी असते. तरी देखील वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे.तसेच खाजगी कर्मचाऱ्यांमुळे रजिस्ट्रीसाठी येथे येणाऱ्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, खाजगी कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे अनेक वाद या कार्यालायत नेहमी होतांना दिसून येतात.या ठिकाणी दलालांचा मोठा सुळसुळाट झाल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या लोकांना मोठा अर्थिक झटका बसत असल्याचे व्यवहारासाठी आलेल्या लोकांच्या चर्चेतून ही माहीती समोर येत आहे.
        दस्त नोंदणी झाल्यानंतर व्यवहाराच्या आॅनलाईन नोंदी झालेली कागदपत्रे त्वरीत देणे आवश्यक असतांना देखील खाजगी कर्मचारी चिरिमिरीसाठी संबंधितांना कागदपञ घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी विनाकारण बोलावले जाते.परिणामी ग्रामीण भागातून येणा-या नागरिकांना एकाच कामासाठी दोन - दोन हेलापाटे माराव्या लागत आहेत.या कामांचा बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना काम न झाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी या कार्यालयात येणा-या एखाद्या जोडप्याला गैरसोयींचा सामना करावा लागतो. कार्यालयातील सर्व्हरची गती वाढविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून केली जात आहे.या कार्यालयाचा कारभार नावाला सरकारी अधिकारी बघत असून या कार्यालयाचे सुञधार माञ  खाजगी कर्मचारी व दलालच  पाहत असल्याचे या कार्यालयात फेरफटका मारल्यानंतर दिसून येत आहे.
----------------------------------------
दुय्यम निबंधक कार्यालयातील 'तो' एक मोठा आधिकारी महामार्गावरील एका हॉटेलात बसून या कार्यालयाचे भ्रमनध्वनीव्दारे कारभार चालतो त्यामुळे या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या जनतेची मोठी कुचंबना होत असून अर्थिक फटका बसत आहे.
----------------------------------------
सबरजिस्टर कार्यालयात एजंट मोठ्या प्रमाणात झाले असून दिवसभरात गोरगरीब जनतेचे कामे करून हजारो रुपयांना गंडा घालून जनतेला त्रास देण्याचा 'खेळ' या  ठिकाणी चालू असून वरिष्ठ अधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरीकांतून व्यक्त केले जात आहे.