Breaking News

मुंगशी येथे बिबट्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला, हल्लात तरुण बालबाल बचावला.

मुंगशी येथे बिबट्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला !
हल्लात तरुण बालबाल बचावला !
-------------
मुंगशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट.


पारनेर प्रतिनिधी-
तालुक्यातील मुंगशी येथे आज पहाटे चारच्या सुमारास एक तरुण झोपलेला असताना बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर पारनेर येथील ओंकार हॉस्पिटल मध्ये  उपचार घेण्यात आले आहेत बिबट्याने तरुणावर हल्ला केल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुंगशी येथे दि.26 रोजी रात्री चारच्या सुमारास प्रवीण मारुती करपे वय बावीस वर्ष हा तरुण आपल्या घराच्या समोर असणाऱ्या छपरा मध्ये झोपलेला असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यामध्ये हा तरुण जखमी झाला आहे त्याच्या डोळ्याला व डोक्याला बिबट्याने पंजा मारल्याने जखमा झाल्या आहेत बिबट्याने हल्ला केल्यानंतर तरुणाने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या आवाज ऐकून पळून गेला यामुळे या तरूणाचा प्राण वाचला मात्र त्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने पारनेर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे.


ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबतची माहिती कळवली त्यानंतर त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पल्लवी जगताप वनरक्षक गजानन वाघमारे वनरक्षक उमाताई केंद्रे वनकर्मचारी जनार्धन बोरुडे काशिनाथ पठारे यासह पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या भागांमध्ये पाहणी केली तसेच परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काही ठसे आढळले आहे अशी माहिती त्यांनी दिली याबाबत पंचनामा करण्यात आला असून तरुणाला लागणारे वैद्यकीय बिल त्याबाबतचा पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती वनपाल पल्लवी जगताप यांनी दिली.
दरम्यान या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी तीन ते चार कुत्रे बिबट्याने नेले असल्याची माहिती समोर येत आहे तसेच तरुणावर हल्ला केल्यानंतर काही वेळानंतर बिबट्याला एका महिलेने मुंगशी परिसरामध्ये पाहिले असल्याची माहिती समजली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी या भागांमध्ये पिंजरा लावावा अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.