Breaking News

अबब... महाविज वितरण कंपणी विद्युत 'खंबे' बनले धोकादायक !

अबब... महाविज वितरण कंपणी विद्युत 'खंबे' बनले धोकादायक !


नेवासा तालुका प्रतिनिधी
महाविज वितरण कंपणीने विज ग्राहकांना विद्युत पुरवठा करतांना काही वर्षापुर्वी दिलेले विद्यत खंबे कमी उंचीचे टाकल्यामुळे आता ते धोकादायक ठरत असून व्यावसायिकांना ते अडचणीचे ठरत असल्याने महाविज वितरण कंपणीच्या या विद्युत 'खंब्या' मुळे मानवाच्या जिविताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
  नेवासा फाटा व परिसरात व्यावसायिकांना विद्युत पुरवठ्यासाठी काही वर्षांपुर्वी टाकलेले विद्युत 'खंबे' आता अंत्यत धोकादायक ठरत असून व्यावसायिकांच्या पञ्याच्या उंची पासून हातभरवर असल्याने हा 'खंब्या' मुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असून महाविज वितरण कंपणीने या जुन्या खंब्यांची उंची वाढवून विद्युत वाहीन्याच्या तारा वर घेण्याची मागणीही आता व्यवसायिकांतून केली जात आहे.