Breaking News

बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथे कोविड १९ विषयावर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथे कोविड १९ विषयावर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

पाथर्डी प्रतिनिधी :
बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथे कोविड १९ विषयावर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत ८ वी ते १२ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे आयोजन प्राध्यापिका आशा पालवे मॅडम यांनी तर परीक्षण डॉ डोळस यांनी केले.

  या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोविड १९ या विषयावर ५ मिनिट विचार मांडताना त्यांनी राष्ट्रीय स्तरापासुन ते ग्रामीण भागापर्यत याचे परिणाम कसे झाले याचा उदाहरणासहित संदर्भ दिला.शासकीय यंत्रणा,आरोग्य विभाग,पोलीस प्रशासनाच्या कामाबद्दल आभार ही मानत,एक नागरिक म्हणून आपण ही जबाबदारीचे भान ठेवत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची विनंती केली.
  
   सदरील स्पर्धेत गट अ मधून प्रथम क्रमांक ढाकणे भगवान,द्वितीय निऱ्हाळी प्रणाली.तर गट ब मध्ये प्रथम क्रमांक जिवडे प्रदीप, द्वितीय फुंदे भागीरथी यांनी मिळवले.

 पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,पर्यवेक्षक शेखर ससाणे,मुख्याध्यापिका बारवकर मॅडम,समन्वयक गायके सर यांनी विजेत्याचे अभिनंदन केले.