Breaking News

मनसेचे एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर काठी घुंगरु आंदोलन

 



नवी मुंबई : एपीएमसीच्या कायद्यात बदल केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर आज  आंदोलन केले . विशेष म्हणजे यावेळी मनसेकडून काठी घुंगरुच्या निनादात शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक वेशात आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने एपीएमसीच्या कायद्यात बदल करून मोठया उद्योजकांना शेती व्यवसायात शिरण्यासाठी लाल गालिचा अंथरला आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली मोठया उद्योजकांना शेती व्यवसाय देण्याचा घाट घातला आहे. यावर महाराष्ट्र राज्यातील सर्वपक्षीय नेते मौन बाळगून बसले आहेत, असा आरोप यावेळी मनसेने केला आहे.


धान्याशी निगडित शेतीबाबत केंद्र सरकारने हा तुघलकी निर्णय घेतला आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर चक्का जाम करण्याचा इशारा मनलेने दिला आहे. या आंदोलनात मनसे सैनिक बाळासाहेब शिंदे, प्रसाद घोरपडे, पप्पू शिंदे, मयूर आदि सहभागी झाले होते. यावेळी सरकारला नारळ भेट देऊन निषेध करण्यात आला.

दरम्यान, निर्यात बंदीचा फरक एपीएमसी मार्केटवर पडला नाही. एपीएमसी मार्केटमध्ये सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. नवीन कांदा सध्या बाजारात आला आहे. पण त्याला उठाव नाही. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होईल, असं एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.