Breaking News

राळेगण थेरपाळ येथे तीन हजारची गावठी दारू जप्त आरोपी फरार !

राळेगण थेरपाळ येथे तीन हजारची गावठी दारू जप्त आरोपी फरार !


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे गावठी हातभट्टीची दारू ची विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली असताना पारनेर पोलिसांनी टाकलेल्या छाप्या मध्ये तीन हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली असून एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विकास फक्कड पवार राहणार राळेगण थेरपाळ तालुका पारनेर (फरार)
हा घराच्या आडोशाला राळेगण थेरपाळ येथे विनापरवाना बेकायदा 3000 रुपये किमतीची 30 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आंबट उग्र वास येत असलेली चोरून विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला पोलिसांनी टाकलेल्या छाप्या वेळी आरोपी पळून गेला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पांडुरंग पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोत्रे करत आहेत.