Breaking News

नाटेगावातील स्मशान भूमीतील लाईटचा प्रश्न मार्गी ,१०० वर्षांत प्रथमच लागणार लाईट

नाटेगावातील स्मशान भूमीतील लाईटचा प्रश्न मार्गी 
,१०० वर्षांत प्रथमच लागणार लाईट


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
   कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील स्मशान भूमी गावापासून अर्धा की.मि. अंतरावर असून रात्रीच्या वेळेस अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना उजेडासाठी टेंभे करून जावे लागत.फार मोठी अडचण निर्माण होत होती ही अडचण ओळखून सरपंच कल्पना प्रभाकर मोरे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विशेष तरतूद करत आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावापासून ते स्मशान भूमी पर्यंत नऊ पोल त्या प्रत्येक पोलवर लाईट स्मशान भूमीतही लाईट ची व्यवस्था करण्याच्या कामाचा शुभारंभ केल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे.
       नाटेगाव ग्रामपंचायतच्या कार्यकारिणी मंडळाची पाच वर्षांची मुदत संपली या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरपंच उपसरपंच निवडही रोटेशन पद्धतीने ठरवून प्रत्येकाला संधी देण्यात आली ९ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक वर्षी सरपंच उपसरपंच बदलण्यात आले. प्रत्येकाने आपापल्या कार्यकाळात गावासाठी काहींना काही योगदान देत शासनाच्या योजनांचा पाठपुरावा करत ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाला गावपण देण्याचा प्रयत्न केला अंतीम १ वर्षांची सरपंच पदाची धुरा कल्पना प्रभाकर मोरे यांनी सांभळत ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून ची इच्छा असलेला स्मशान भूमी पर्यंत स्ट्रीट लाईट व स्मशान भूमीत हायमॅक्स ची ग्रामपंचायतच्या १४वा वित्त आयोगातून पूर्ण केली . या कामाचा शुभारंभ सरपंच कल्पना प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉ.गोरख मोरे,जालिंदर उळेकर,प्रभाकर मोरे,गोरख ( पप्पू )मोरे ,ज्ञानेश्वर मोरे,नारायण मोरे,रामनाथ मोरे,कचरु तिपायले,  कॉन्ट्रॕक्टर समाधान काळे, ग्रामसेविका श्रीमती औचित्ये सह ग्रामस्थ उपस्थित होते