Breaking News

अकोल्यात कोरोना रुग्ण संख्या दीड हजाराच्या उंबरठ्यावर!

अकोल्यात कोरोना रुग्ण संख्या दीड हजाराच्या उंबरठ्यावर!


अकोले /प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील कोरोनाला रुग्ण संख्या दीड हजाराच्या उंबरठयावर आली आहे काल सोमवारी अकोले तालुक्यात 58 कोरोना  बाधित आढळले आज ही  मंगळवारी   अकोले शहरातील सर्व व्यापाऱ्यांची कोरोनाला तपासणी करण्यात येणार आहे
 काल  अकोले  शहरातील   अगस्ती मंगलकार्यालयात करण्यात आलेल्या  कोरोना तपासणीत शहरातील  व्यापारी ,दुकाने , वेगवेगळी आस्थापनेतील  कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील  सदस्यांची  तपासणी करण्यात आली त्यात    ४६७ व्यक्तीच्या टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये  ३८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह तर ४२९  व्यक्ती निगेटिव्ह आले आजही ही तपासणी सुरू राहणार आहे नागरिकांनी कोणतीही भी ती न बाळगता   तपासणी करून  घ्यावी असे आव्हान   तहसीलदार मुकेश कांबळे  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंद्रजित गम्भीरे, अकोले नगर पंचायतीचे मुख्याधिकारी  यांनी केले आहे
----