Breaking News

अकोले तालुक्यात आज नवीन ०६ कोरोना पॉझिटिव्ह !

अकोले तालुक्यात आज नवीन ०६ कोरोना पॉझिटिव्ह!


अकोले /प्रतिनिधी
    अकोले तालुक्यात आज आणखी ६ नवीन कोरोनाला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
तालुक्यात आज घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये महालक्ष्मी कॅालणीतील ३७ वर्षीय पुरूष, अगस्ती कारखाना रोडवरील ६० वर्षीय पुरूष, ५७ वर्षीय महीला, विठा येथील ४० वर्षीय पुरुष अशा चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात कोतुळ येथील ३२ वर्षीय महीला , खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात अकोले शहरातील सावरकर रोडवरील २६ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला .
आज तालुक्यात ०६ व्यक्ती पॅाझिटीव्ह आढळल्या असुन तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५५७ झाली आहे त्यापैकी ४४० व्यक्ती उपचारा नंतर  बरे होउन घरी गेलेत ११ व्यक्ती मयत झालीत १०६ व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.
------