Breaking News

पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई व देसवडे येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण!

पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई व देसवडे येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण!
---------
दोन्ही अपहरण प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील  दोन वेगवेगळ्या सारोळा अडवाई व देसवडे गावातील घटनेमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये  दोन वेगवेगळ्या दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
पहिल्या घटनेत तालुक्यातील सारोळा अडवाई येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सारोळा अडवाई येथील अल्पवयीन मुलगी 17 वर्ष पाच महिने वडील शेतात गेले असताना दि.10 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तिची जामगाव येथील मैत्रिणीच्या घरी वह्या आणण्यासाठी जाते असे सांगून गेली परंतु ती अद्याप पर्यंत घरी न आल्याने वडिलांनी तिचा जामगाव परिसरात तसेच त्यांचे नातेवाईक व  मैत्रिणींकडे चौकशी केली परंतु ती मिळून आली नाही तिच्या मोबाईल नंबर यावरही संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे  खात्री झाली की त्यांच्या मुलीला कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी पळून नेले आहे त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेमध्ये तालुक्यातील देसवडे येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  दि 2 रोजी. रात्री 10.00 वाजता ते 03 रोजी 02.00 वाजताच्या सुमारास देसवडे,  तालुका पारनेर ता पारनेर,  अ.नगर. येथून मुलीचे वडील घरी झोपलेले असताना 17 वर्षे तीन महिने या मुलीस कोणीतरी अज्ञाताने  अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी पळून नेले आहे याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जे. एच. शेख करत आहेत.