Breaking News

दिलासादायक ! रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर

 नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे ९० हजारांपेक्षा जास्त आकडे समोर येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाची ९३,३३७ नवीन रुग्ण समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

भारतात कोरोना रुग्ण लवकर बरे होत आहेत. या संसर्गापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात जास्त आहे. यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून अमेरिकेलाही त्याने मागे टाकले आहे. एकूण जागतिक रिकव्हरी रेटमध्ये भारताचा १९% वाटा आहे. तर भारतातील ७९.२८% रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.