Breaking News

कोरोना काळात समाज सेवेचे व्रत !

कोरोना काळात समाज सेवेचे व्रत !


शिर्डी/प्रतिनिधी :
शिर्डी मध्ये कोरोणाचे रुग्ण मोठ्या संख्येने दिवसेंदिवस आढळत असून त्यामुळे शिर्डी शहरात कोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने इतर अचानक नागरिकामध्ये ही घबराट पसरली आहे ,
शिर्डी तील लक्ष्मीनगर भागात
सर्वसामान्य व गोरगरीब नागरिक राहतात ,येथे कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढू नये ,म्हणून शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष साई कोतकर यांनी स्वतः समाजसेवा म्हणून शिर्डी शहरातील लक्ष्मी नगर भागात संपूर्ण गल्ल्यांमध्ये व संपूर्ण भागांत जंतनाशक फवारणी व सैनेटायझशन केले आहे.
              शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष साई कोतकर यांनी स्वतःपुढे येऊन आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शिर्डी शहरात कष्टकरी समाज, मध्यम वर्गातील लोक ज्या ठिकाणी राहतात, त्या भागात आज गुरुवारी  सकाळी सर्व परिसरात सॉनेटायजेंझशन करण्यात आले, सर्व लक्ष्मीनगर भागातील गल्ल्या,दुकाने परिसर, व घरासमोरील परिसर, मोकळ्या जागा या ठिकाणी जंतनाशक फवारणीव सनिटेजंशन करण्यात आले, लक्ष्मीनगर भागात दुसऱ्यादा जंतनाशक फवारणीव सनिटेजंशन करण्यात आली आहे, साई लक्ष्मण कोतकर यांनी समाजसेवा
या भावनेतून यापूर्वीही या भागात सनिटेशन करण्यात आले होते व
आताही परत करण्यात आले ,त्याचप्रमाणे लॉकडाऊन च्या काळात या लक्ष्मीनगर भागात कोतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गोरगरिबांना, गरजूंना किराणा वाटप करण्यात आले होता, ते
वेगवेगळ्या प्रकारे कोरोनाच्या काळात लक्ष्मीनगर भागातील गोरगरीब
सर्वसामान्य व्यक्तींना मदत करताना दिसून येत आहेत, त्यांचे या
कार्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे, प्रसिद्धी झोतापासून दूर असलेले साई लक्ष्मण यांनी कोरोणाच्या काळात इतरही समाजसेवा केली आहे मात्र त्यांनी प्रसिद्धी माध्यमा पुढे येण्याचे टाळले होते, मात्र नागरिकांच्या व इतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आज सकाळी लक्ष्मी नगर भागात सनिटेंशन केल्याचे सांगितले, साई कोतकर प्रयत्नांनाचे  सर्वत्र, शिर्डी शहरातून कौतुक होत आहे.