Breaking News

नवनाथ सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक !

नवनाथ सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
      कोपरगाव  तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हरिसन ब्रँच शाळेचे शिक्षक नवनाथ सूर्यवंशी यांना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
     पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला.
नवनाथ सूर्यवंशी आपल्या पंधरा वर्षाच्या शिक्षण सेवेमध्ये नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये रुची वाढवण्यासाठी योगदान दिले. आपल्या देशासह विविध देशाच्या उच्च अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क करून विद्यार्थ्यांशी संपर्क साधला.अगदी लोकशाही निवडणुकीप्रमाणे ईव्हीएम मशीन चा वापर त्यांनी करून शाळेतील सर्व विद्यार्थी समितीच्या निवडी केल्या. शाळेमध्ये परस्पर करून मुलांना शेतीशाळेचे ज्ञान दिले. लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत पाठ्यपुस्तकातील लेखकांशी विद्यार्थ्यांशीं संवाद साधुन दिला. असे अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची वाढली आणि याची दखल घेत चालू वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.