Breaking News

कोपरगावातील खाजगी कोरोना तपासणी लॅबला शिवसेनेचे आवाहन !

कोपरगावातील खाजगी कोरोना तपासणी लॅबला शिवसेनेचे आवाहन


करंजी प्रतिनिधी-
सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील खाजगी लॅब या कोविड -१९ रॅपिड टेस्ट करतात या संदर्भात कोपरगाव शहर शिवसेनेचे नूतन शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने प्रायव्हेट लॅब टेस्टिंग सेंटरला रुपये ८०० इतकी फिस घेण्यास परवानगी दिली आहे.  कोपरगाव शहरात वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेस,निदान क्लिनिकल लॅबोरेटरी, सर्वदा क्लीनिकल लॅबरोटरी व कोपरगाव क्लिनिकल लॅबोरेटरी या चार प्रायव्हेट लॅब सध्या कविड-१९  रॅपिड टेस्ट करतात. तरी शहर शिवसेनेच्या वतीने वरील चार ही लॅब ला रुपये ८०० फी आकारण्यास आवाहन केले आहे व  तसे फलक लॅब बाहेर लावण्यास सांगितले आहे. वरील सर्वच लॅबनी ८०० रुपये फी आकारण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानले.  त्यामुळे कुठल्याही खासगी लॅब यांनी रुपये ८०० पेक्षा अधिक फी आकारल्यास त्यांचे लॅबचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस ही आरोग्य विभागा मार्फत शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. 
   
   तसेच कविड-१९ रॅपिड टेस्ट एस एस जी एम महाविद्यालय, कोपरगाव येथे सकाळी १० ते १२ या वेळेत विनामूल्य सुरू आहे. तरी कोपरगावकरांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असेही आवाहन शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी कोपरगाव शिवसेना नूतन शहरप्रमुख कलविंदर सिंग दडीयाल,एसटी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, युवा नेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, वाहतूक सेना तालुका प्रमुख इरफान शेख,विजय शिंदे, सचिन मोरे व आदी शिवसैनिक  उपस्थित होते.