Breaking News

तालुका कृषी अधिकारी यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले

तालुका कृषी अधिकारी यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले
------------------
 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी शेतकरी नेते अनिल देठे


पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे  यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे याचे पंचनामे करण्याचे आदेश शासन पातळीवर देण्यात आले आहे मात्र पारनेर तालुक्यामध्ये याबाबत उदासीनता पहावयास मिळत आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना याबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारचे वरिष्ठांचे आदेश प्राप्त नाहीत अशा प्रकारचे उत्तर दिले आहे यामुळे तालुका कृषी अधिकारी यांच्या आडमुठ्या भूमिके मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे तालुक्यांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संततधार पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे यामुळे लाखो रुपयांचे पिके वाया गेली आहे अनेक भागात शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतमाल पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे याचे पंचनामे करावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी नेते अनिल देठे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली मात्र कृषी अधिकारी यांनी आपल्याला वरिष्ठांकडून आदेश आले नाहीत त्यामुळे आपण पंचनामे कसे करणार अशा प्रकारचे उत्तर त्यांना दिले मात्र शासन स्तरावरून 22 सप्टेंबर रोजी ज्या भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे त्वरित पंचनामे करावे असे आदेश देण्यात आले आहेत याकडे देखील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे नेमके तालुका कृषी अधिकाऱ्यांना कोणाचे आदेश पाहिजे असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड हे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करत नसतील तर कृषी अधिकाऱ्यांची भूमिका ही शेतकरी विरोधात आहे का अशा प्रकारचा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हे शेतीच्या मशागतीला लागले आहेत जे पिके वाया गेले आहेत ते सध्या शेताबाहेर काढण्याचे काम शेतकरी करत आहेत जर कृषी अधिकाऱ्यांचे पंचनामे हे उशिराने सुरू झाले तर नुकसान झालेले पिके हे शेतकऱ्यांनी शेताबाहेर काढल्या नंतर पंचनामे अधिकारी कशाचे करणार असा सवाल उपस्थित होत आहे.

तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्वरित पंचनाम होणे गरजेचे आहे सध्या पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे जे पिके वाया गेली आहेत ते शेतातून काढून दुसरे पीक घेण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावेत जेणेकरून वाया गेलेली पिके शेतात असतील व त्याचे फोटो काढून या पिकांचे पंचनामे करता येतील अन्यथा उशीर झाल्यास सर्व पिके शेतकरी शेताबाहेर काढून टाकतील मग पंचनामे कशाचे करणार असे शेतकरी नेते अनिल देठे यांनी सांगितले