Breaking News

महाराष्ट्र घडविण्यात माजी मंत्री बी जे खताळ यांचे योगदान - भाऊसाहेब वाकचौरे

महाराष्ट्र घडविण्यात माजी मंत्री बी जे खताळ यांचे योगदान --- भाऊसाहेब वाकचौरे


अकोले/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवमहाराष्ट्र घडविण्याचे काम बी. जे. खताळ पाटील यांनी केले असून अनेक धरणे बांधून शेतकऱ्यांची उन्नती करण्यात मोला चे कार्य केले आहे. असे मत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.
             देवठाण ता अकोले येथे खताळ पाटील यांच्या प्रथम स्मूर्ती दिनाचे निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित अभिवादन सभेत वाकचौरे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल सोनवणे हे होते. यावेळी पाटबंधारे विभाग नाशिक चे वराडे,  शिवाजी पाटोळे, राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष जालिंदर बोडके, भाजयुमो चे तालुका उपाध्यक्ष केशव बोडके, नामदेव निसळ, राष्ट्रवादी अध्यक्ष अनिल शेळके, तुकाराम पाटोळे आदी उपस्थित होते.
               श्री वाकचौरे  बोलताना पुढे म्हणाले की, खताळ पाटील हे तत्वनिष्ठ राजकारणी होते. शेवट पर्यंत काँग्रेसचे विचार जपणारे गांधीजी विचार अन गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारे अन कुठलीही अपेक्षा न बाळगणं तेे तत्वनिष्ठ राजकारनी होते.
पाटबंधारे मंत्री म्हणून महाराष्टात अनेक धरणाचे शिल्पकार, संगमनेर साखर करखाण्याचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदारांची मुलगी असताना सुध्दा आपल्या पत्नीला राजकारणात न आणणारे तत्वनिष्ठ पुढारी होते.
माझ्या पुण्याई वर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणात या असा सल्ला आपले मुलांना, नातवंडे यांना देणारे तत्वनिष्ठ पालक होते. मी सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून स्वतः च्या नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तींचा वैयक्तिक लाभ न देणारे तत्वनिष्ठ नेता होते. देशाच्या स्वतंत्र लढ्यात भाग घेऊनही स्वतः कधीही त्याची टिमकी न मिरवणारा तत्वनिष्ठ स्वातंत्रसेनानी होते. न्यायाधीश पदाची ऑर्डर आली अन पक्षाने उमेदवारी ऑर्डर दिली  पक्षासाठी नोकरीला ठोकर मारून पक्ष विचारला महत्व देणारा तत्वनिष्ठ कार्यकर्ता, संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून काँग्रेस ची उमेदवारी नाकारली पण काँग्रेसच्याच उमेदवार चा प्रचार करणारा  काँग्रेस चा सच्चा तत्वनिष्ठ कार्यकर्ता होते. मी येथून पुढ निवडणूक लढवणार नाही अन राजकारण करणार नाही असं एकदा बोलले अन शेवटपर्यंत म्हणजे ३५ वर्ष त्या शब्दावर ठाम राहणारे तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व होते. असेही श्री वाकचौरे यांनी सांगितले.
      कार्यक्रमाचे प्रास्तविक जालिंदर बोडके यांनी केले तर शामकांत गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश बोडके, प्रकाश शेळके, प्रथमेश सहाणे,शामकांत गायकवाड, गणेश साळवे, गंगाराम बर्डे, अहिलाजी गागंड यांनी केले.

   राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे अध्यक्ष जालिंदर बोडके यांनी खताळ पाटील यांचे भव्य दिव्य असे स्मारक आढळा धरण येथे व्हावे अशी मागणी करत आढळा परिसरातील प्रत्येकाने आपले घरात फोटो लावावे असेही म्हटले आहे.
---------