Breaking News

डॉ. शारदा महांडुळे यांचा स्टार वर्ल्ड रेकॉर्डने केला गौरव !

 

अहमदनगर, - आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या केडगाव येथील डॉ. शारदा महांडुळे यांची स्टार वर्ल्ड रेकाॅर्डने दखल घेतली असून त्यांच्या कार्याची नोंद घेऊन स्टार वर्ल्ड रेकाॅर्डने त्यांना स्टार वर्ल्ड रेकाॅर्ड २०२० ने गौरवण्यात आले.

      गेल्या २० वर्षांपासून डॉ. शारदा महांडुळे या आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेक आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली आहे.वंधत्व असणाऱ्या हजारो दाम्पत्यांना त्यांच्या संशोधन पूर्वक आयुर्वेदिक औषधांनी संतती झालेली आहे.त्यात टेस्ट ट्यूब बेबीसारखे उपचार अयशस्वी झालेले अनेक दाम्पत्य आहेत की,त्यांना लग्नानंतर २०,२५ वर्षांनी अपत्य प्राप्ती झालेली आहे.त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय,आंतर राष्ट्रीय स्तरापर्यन्त घेतलेली आहे.मागच्याच वर्षी त्यांना केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते राष्ट्रीय आयुर वूमन अवॉर्ड मिळाला आहे.गर्भिणी प्राशचे संशोधन करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यासाठी त्यांना या पूर्वी अनेक विश्व विक्रम मिळाले आहेत.

      आता ही कोरोना महामारीच्या काळात सर्वांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहीले पाहिजे या भावनेतून डॉ. शारदा महांडुळे यांनी दुर्वांकुर आयुर्वेद यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आरोग्या विषयी समाजामध्ये जनजागृती केली.अनेक घरगुती आयुर्वेदिक उपचारांनी स्वतः ची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवू शकतो? त्या साठी आयुर्वेदिक चहा,काढा,हळदीचे दुध कसे बनवावे याचे लाईव्ह प्रोग्राम घेतले,स्त्रियांच्या आरोग्य समस्या आणि उपाय अशा अनेक विषयांवर निरपेक्ष भावनेने वेळात वेळ काढुन मार्गदर्शन केले.त्यांच्या या कार्याची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड पब्लिशिंग लिमिटेड,युनायटेड किंगडम यांनी त्यांना स्टार वर्ल्ड रेकाॅर्ड २०२० ने गौरवण्यात आले आहे.