Breaking News

सुजित झावरे यांनी शासकीय कामात अडथळा आणून खंडणी मागितल्या प्रकरणी त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करा.

सुजित झावरे यांनी शासकीय कामात अडथळा आणून खंडणी मागितल्या प्रकरणी त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करा !
----------------
तहसीलदार ज्योती देवरे व त्यांच्या कुटुंबाला संबंधितां कडून इजा पोचू शकते त्यासाठी सुरक्षा पुरवण्यात यावी !
-----------------
महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ यांनी केली निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे मागणी !


पारनेर प्रतिनिधी -
       पारनेरच्या तहसिलदार, ज्योती देवरे यांचा अश्लिल भाषेत संभाषण करून विनयभंग केलेबाबत. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणून त्यांचेकडून खंडणी मागणाऱ्या संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई होणेबाबत   महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे निवेदनाद्वारे त्यांनी संबंधितावर त्वरित कार्यवाही करावी व देवरे यांना व त्यांच्या कुटुंबांना संबंधितांकडून इजा पोहोचण्याचा धोका असल्याने तातडीने सुरक्षा पुरवण्याचे प्रयोजन करावे अशी मागणी केली आहे.
       या निवेदनात म्हटले आहे पारनेरच्या तहसिलदार, श्रीमती ज्योती देवरे, या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील स्थानिक राजकीय पदाधिकारी श्री. सुजीत झावरे यांनी त्यांचेशी फोनवर अश्लील भाषेत संभाषण करून, त्यांचेकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बेकायदेशीररित्या जमावांसह त्यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या कामकाजांत अडथळा देखील आणण्याचा गंभीर प्रसंग घडला आहे. याप्रकरणी तहसिलदार, श्रीमती ज्योती देवरे यांनी पारनेर पो.स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली असून, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यास अक्षम्य विलंब आणि टाळाटाळ करणाऱ्या संबंधितांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच सदर नोंद गुन्ह्याची निष्पक्षपने सखोल चौकशी करून या कृत्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सामील असलेल्या श्री. सुजीत झावरे यांचेसह सर्वांवरच कठोर कायदेशीर कारवाई करण्याची महासंघाच्यावतीने आग्रही मागणी केली.
       स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा गुन्ह्यांत असलेला समावेश आणि त्यांचा निर्टावलेपणा पाहता या प्रकरणात तक्रारदार महिला अधिकाऱ्यांवर सर्वतोपरी दबाव टाकण्याचा किंवा इजा पोहोचविण्याचा संबंधितांकडून प्रयत्न होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे धिरोदत्तपणे अशा समाज कंटकावर गुन्हा दाखल करण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या श्रीमती ज्योती देवरे यांना वैयक्तिक तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील तातडीने सुरक्षा पुरविण्याचे प्रयोजन प्रशासनाने करावे, या करिता संबंधिताना आपल्या स्तरावरून वैयक्तिकरित्या निर्देश देण्यात यावेत, ही आग्रही विनंती आहे.
या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गृहमंत्री अनिल देशमुख पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील देण्यात आले आहे.