Breaking News

पूर्व लडाखमध्ये भारताने उभारले टँक रेजिमेंट

- चीनला दिले उत्तर



लडाख/ प्रतिनिधी

भारत आणि चीनमधील तणाव अधिक वाढत असून, भारतीय सैन्याने पूर्व लडाखमध्ये टँक रेजिमेंट मैदानात आणून चीनला उत्तर दिले आहे. या रेजिमेंटमध्ये भीष्म, अर्जुन सहीत अत्याधुनिक टँक आहेत. विरोधक चीनला यामुळे धडकी भरु शकते. 

हे टँक कोणत्याही परिस्थितीत युद्ध करण्याची क्षमता ठेवते. या टँक रेजिमेंट आणल्यानंतर भारताने चीनला स्पष्ट संदेश दिला. युद्धजन्य स्थितीत विरोधकांच्या एरियात घुसण्यास कमी करणार नाही हे चीनला कळाले आहे. सपाट भागात टँक तैनात करण्यात आले. लडाख भाग हा पर्वतरांगांचा भाग आहे. एलएसीच्या पलिकडे अक्साई चीनचा पठारी भाग आहे. यावर टँक सहज धावू शकतो आणि युद्धात कामी येऊ शकतो. युद्ध झाल्यास त्यांच्या भूमित होईल हा संदेश या कृतीतून भारताने दिला आहे.