Breaking News

युवकांनी काळाची गरज ओळखून संघटनेत काम केले पाहिजे - बशीर पठाण

युवकांनी काळाची गरज ओळखून संघटनेत काम केले पाहिजे - बशीर पठाण
------–----
स्वाभिमानी मराठा शेवगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल सुपेकर यांचा सत्कार. 


घोटण प्रतिनिधी :
      मराठा संघटना युवा कार्यकर्त्यावर समाज सुधारणा होण्याची जबाबदारी देत एक दिशादर्शक काम करत असून युवकांनी काळाची गरज ओळखून संघटनेत काम केले पाहिजे असे मत अहमदनगर भाजप अल्पसंख्याक जिल्हा चिटणीस बशीर पठाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघ शेवगाव तालुका अध्यक्षपदी भाविनिमगाव येथील अनिल सुपेकर यांची संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले व अहमदनगर जिल्हाध्यक्ष  अंकुश डांभे  यांंनी नुुुुुकतीच नियुक्ती केेली.  नवनियुक्त तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांच्या निवडीबद्दल दहिगाव-ने येथे भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी  सत्कार प्रसंगी जिल्हा सरचिटणीस मुस्साभाई शेख, चिटणीस बशीर पठाण, दहिगाव-ने भाजप संघटक शरद थोटे, कल्याणमामा जगदाळे, बाळासाहेब भिसे, विजय नजन,शिवाजी मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
सध्या मराठा समाजाची होत असलेली गळचेपी व शासकीय स्तरावर अवहेलना या विरोधात आणि शेतकरी न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहुन संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत नवनियुक्त तालुकाध्यक्ष सुपेकर यांनी यावेळी सांगितले.