Breaking News

पोलीस आधिकार्यांच्या साक्षीने दोन्ही नवलेंचे वाद मिटविण्यात सुनिल मुथा यांना आले यश !

पोलीस आधिकार्यांच्या साक्षीने दोन्ही नवलेंचे वाद मिटविण्यात सुनिल मुथा यांना आले यश !


बेलापूर/प्रतिनिधी -
      श्रीरामपूर तालुक्यातील दोन पुढार्यांचे मुद्द्यावरुन गुद्यापर्यत पोहोचलेले वाद पोलीस अधिकार्यांच्या साक्षीने मिटविण्यात टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष व बेलापूर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांना मिटविण्यात यश आले. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व त्यांचा पुतण्या बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यातील वाद तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला माहीती आहे दोनही नवले एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात अघाडीवर असत ग्रामपंचायत कार्यालया पासुन ते जिल्हा परिषदे पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने एकमेका विरोधात करण्यात आली होती दोघांचेही वाद अतिशय विकोपाला गेले होते कित्येक वेळा हमरा तुमरीचे प्रकार झाले होते काल तर या सर्वाचा कळस झाला ग्रामपंचायत कार्यालयात झालेली बाचाबाची लाठ्या काठ्या पर्यत पोहोचली दोघांच्याही नातेवाईकात भर चौकात हाणामारी झाली त्या नंतर तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशनला गेल्यावरही दोघांचेही नातेवाईक पुन्हा आपापसात भिडले त्याच वेळी बेलापूर पत्रकार सांघाचे खजिनदार सुनिल मुथा तेथे पोहोचले दोन्ही गटात चाललेल्या मारामार्या पोलीस उपनिरीक्षक उजे  बेलापूरचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ व सुनिल  मुथा यांनी बळाचा वापर करुन सोडविल्या त्या वेळी फार मोठा जमाव जमला होता आता दोघावरही गुन्हे दाखल होणार किती जणांना अटक होणार याची चर्चा रंगत असतानाच सुनिल मुथा यांनी शरद नवले व सुधीर नवले यांना घटनेच्या गांभीर्याची जाणीव करुन दिली तुमच्या दोघात असलेल्या वादाचे परिणाम   दोन पिढ्यांना भोगावे लागतील फालतु भांडणात तुमचे कुटूंब उध्वस्त होतील त्यामुळे दुरचा विचार करुन हे वाद सोडून द्या असे उपविभागीय अधिकारी राहुल मदने व सुनिल मुथा यांनी सुचविले अन उपविभागीय  पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस  निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या समक्ष दोघांनीही आपापली चुक कबुल करत माघार घेतली सुनिल मुथा यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले अन दोन्ही नवले मधील कटूता कमी होवुन आपसात तडजोड झाली त्याबद्दल अनेकांनी मुथा यांना धन्यवाद दिले आहे